राजापूर : जिल्हा परिषद आदर्श शाळा नं. २ ने केली 'सोलगावची घंटा' अन् परिसराची साफसफाई

Aug 23, 2024 - 10:16
Aug 23, 2024 - 12:27
 0
राजापूर : जिल्हा परिषद आदर्श शाळा नं. २ ने  केली 'सोलगावची घंटा' अन् परिसराची साफसफाई

राजापूर : तालुक्यातील सोलगावच्या सड्यावरील सोलगावची घंटा' म्हणून नावारूपास आलेल्या कातळशिल्पामुळे या भागातील मानवाच्या हजारो वर्षापूर्वीच्या पाऊलखुणा अधोरेखित होत आहेत. या कातळशिल्पासह परिसराची सोलगाव येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा नं. २ या प्रशालेच्या विद्यार्थी, शिक्षकांनीत साफसफाई केली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

निसर्गसंपदेने नटलेल्या सोलगावच्या सड्यावर गेल्या काही वर्षामध्ये वैशिष्टयपूर्ण असलेली कातळशिल्प आढळून आली आहेत. या कातळशिल्पांच्या माध्यमातून हजोरा वर्षापूर्वीच्या मानवाच्या पाऊलखुणा अधोरेखित होते आहे. अशाच वैशिष्टयपूर्ण असलेल्या सोलगावची घंटा म्हणून नावारूपास आलेल्या कातळशिल्प आणि परिसराची सोलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी साफसफाई केली. ऐतिहासिक वास्तु संवर्धन आणि जोपासना या उक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण नांगरेकर, मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याथ्यांनी लक्ष्मण फडके, विशाल सपकाळ, विहन मंगे या शिक्षकांसमवेत हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. प्रशाळया या उपक्रमाचे सर्वस्तरातून जात आहे.

निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून आपल्यासह धनंजय मराठे, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि सहकाऱ्यांनी गेल्या दशकभरापेक्षा अधिक कालावधीमध्ये केलेल्या संशोधनातून मानवाच्या हजारो वर्षापूर्वीच्या पाऊलखुणा अधोरेखित करणारी हजारो कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसह युवा पिढीची सकारात्मक मिळत असलेली साथ आणि सहभाग निश्चितच कौतुकास्पद आहे. सुधीर रिसबुड, कातळशिल्प संशोधक आणि अभ्यासक

वैशिष्ट्यपूर्ण 'सोलगावची घंटा'
तब्बल वीस फूट लांब आणि सतरा फूट रूंदीची ही भलीमोठी चित्ररचना आहे. या चित्ररचनेच्या बाजूला सुमारे १० फूट मगरीचे चित्र, घोरपडसदृश सुमारे सहा फूट लांबीचे चित्र आहे. या चित्ररचनेचा बाह्य आकार एका बाजूने पाहिल्यावर देवळातील घंटेसारखा वाटतो. तर, वरच्या बाजूला साखळी अडकविण्यासाठी असलेला कान त्याखाली लंबवर्तुळाकर आकाराची घंटा. प्रतिकात्मक आणि भौमितिक स्वरूपाची असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण चित्ररचना 'सोलगावची घंटा' म्हणून नावारूपास आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow