'लाडकी बहीण' योजनेसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा : पालकमंत्री उदय सामंत

Jul 16, 2024 - 10:51
Jul 16, 2024 - 10:53
 0
'लाडकी बहीण' योजनेसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा : पालकमंत्री उदय सामंत

चिपळूण : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे. ही पारदर्शक योजना असून, कोणीही पैसे मागितल्यास पोलिसांकडे तक्रार करा, अशांना थेट तुरुंगात टाकण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नाट्यगृहात 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेचा प्रांरभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले की, महिला समुदाय संसाधन व्यक्तींसाठी मोबाईल देण्यात आला असून, त्यासाठी साडेतीन कोटी निधी दिला आहे. सर्व योजना तुमच्यासाठी आहेत. त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. आमदार निकम म्हणाले, महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे.

तळागळातील महिलांसाठी लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला. सर्व महिलांना याचा लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यामध्ये सुधारणाही करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रातनिधिक स्वरुपात महिला लाभार्थ्यांना मंजुरीची पत्रे देण्यात आली. नागरी जीवनोन्नती अभियान उमेदमधून गोवळकोट येथील महिला बचत गटाला धनादेश देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow