रत्नागिरी : जिल्ह्यात होमगार्ड भरतीसाठी शारीरिक तपासणी

Aug 24, 2024 - 11:10
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात होमगार्ड भरतीसाठी शारीरिक तपासणी

रत्नागिरी : जिल्ह्यात होमगार्डची ५०६ रिक्त पदे आहेत. या पदांसाठी जिल्ह्यातून २१०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये गुरुवारी १ हजार, तर शुक्रवारी ४८७ उमेदवारांची कागदपत्रे व शारीरिक तपासणी झाली. गुरुवारी पहिल्याच दिवशी या प्रक्रियेवेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक जयश्री गायकवाड व पोलिस उपअधीक्षक गृह राधिका फडके उपस्थित होत्या.

जिल्ह्यात होमगार्डची ५०६ रिक्त पदांसाठी २१०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ही रिक्त पदे भण्यासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली आहे. या भरतीमध्ये ४५० महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी (ता. २२) सकाळी या भरती प्रक्रियेला पोलिस कवायत मैदानावर सुरुवात झाली होती.

या वेळी आलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी, धावणे, गोळाफेक, छाती उंची आदीची चाचणी घेण्यात आली. शुक्रवारी (ता. २३) उर्वरित ११०० उमेदवारांपैकी ४८७ महिला व पुरुष उमेदवारांची चाचणी घेण्यात आली असून, उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा आहे. या सर्व प्रक्रियेचे पोलिसदलाकडून व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले, ही प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या सुरू असलेल्या चाचणीदरम्यान अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलिस उपअधीक्षक राधिका फडके उपस्थित होत्या.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow