चिपळूणमध्ये २८ रोजी आमसभाचे आयोजन

Aug 24, 2024 - 15:52
 0
चिपळूणमध्ये २८ रोजी आमसभाचे आयोजन

चिपळूण : येथील पंचायत समितीची आमसभा एक दिवस आधी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. कापसाळ येथील माटे संकुल सभागृहात सकाळी ११ वा. आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत ही आमसभा होईल.

याआधी केलेल्या निवेदनानुसार ही आमसभा २९ ऑगस्ट रोजी होणार होती. परंतु, २९ ऑगस्टपासून शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे आमसभेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

तरी तालुक्यातील आजी-माजी सरपंच, जि. प., पं. स. सदस्य, सहकारी सोसायटींचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, मुख्याध्यापक व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांनी केले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:20 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow