रत्नागिरी : झरेवाडी जिल्हा परिषद केंद्र शाळेत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा व रानभाज्या महोत्सव

Jul 30, 2024 - 11:02
Jul 30, 2024 - 11:31
 0
रत्नागिरी  : झरेवाडी जिल्हा परिषद केंद्र शाळेत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा व रानभाज्या महोत्सव

◼️ पाककृती स्पर्धेत नेहा करंडे, वैदेही लिंगायत प्रथम

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने शिक्षण सप्ताहानिमित्त तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा व रानभाज्या महोत्सव झरेवाडी जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित केला. पाककृती स्पर्धेत नेहा करंडे स्वयंपाकी विभागात प्रथम तर वैदेही लिंगायत-झरेवाडी यांनी विभागात प्रथम क्रमांक पटकावला.

पाककृती स्पर्धेत तालुक्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत सात्विक अन्नपदार्थावर भर देण्यात आला होता. याप्रसंगी झरेवाडी शाळेतील इको क्लबच्या माध्यमातून कृषी अधिकारी जयेश काळोखे यांचे मार्गदर्शन सत्र झाले. तसेच रानभाज्या महोत्सवही झाला.

स्पर्धेचे उ‌द्घाटन गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार यांनी स्पर्धेला व रानभाज्या महोत्सवाला भेट दिली. या स्पर्धेचे परीक्षण विजयश्री अवेरे, वैशाली कांबळे आणि शामल नागले यांनी केले. श्रीमती घाडगे व रवींद्र सनगरे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, या उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणा-या झरेवाडी शाळेचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झरेवाडी शाळेचे पदवीधर शिक्षक राजेश गोसावी यांनी केले.

स्पर्धेतील विजेते स्पर्धक
या स्पर्धेत पाककृती स्पर्धा स्वयंपाकी गट- नेहा करंडे (चरवेली-नागलेवाडी), रेश्मा चव्हाण (साठरे नं. २), समिता डांगे (डांगेवाडी), साक्षी पाडावे (झरेवाडी), जान्हवी जोईल (वेळवंड कोठारवाडी, उत्तेजनार्थ), पालक गटामध्ये वैदेही लिंगायत, प्राजक्ता ओमकार, सिद्धी तांबे, दीक्षा कळंबटे, मुग्धा चव्हाण यांनी यश मिळवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow