सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट

Aug 28, 2024 - 16:09
Aug 28, 2024 - 16:29
 0
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट असून, या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे.

संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.pldagmail.com याई-मेल आय. डी. वर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल. स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रक्षणरहित वातावरण, गणेश भक्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा, या निकषांच्या आधारे स्पर्धा परीक्षण केले जाणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 26/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow