निवे खुर्द येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Jul 12, 2024 - 10:44
 0
निवे खुर्द येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला

देवरुख : देवरूख मार्लेश्वर मार्गावरील निवे खुर्द येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो सकल हिंदू समाजाच्या सतर्कतेमुळे मंगळवारी पकडण्यात आला आहे. 

टॅम्पो, दोन पाडे देवरूख पोलिसांनी जप्त केले असून, दोन जणांवर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची खबर प्रमोद शिंदे, देवरूख यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. संतोष बंडु चव्हाण व श्रीराम बापु तळप (दोघेही रा. मलकापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहे. 

प्रमोद शिंदे हे भाडे घेऊन मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निव्याहून देवरुखच्या दिशेने येत होते. निवे येथे टेम्पोमध्ये दोन पाडे बांधलेले त्यांना दिसून आले. याची माहिती शिंदे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांना दिली. यानंतर सकल हिंदू समाज एकत्र आला. हा प्रकार देवरुख पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरवली येथील हे पाडे घेऊन कत्तल करण्याच्या उद्देशाने कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याचे पुढे आले. टेम्पो चालकाकडे गुरे वाहतुकीचा परवाना नव्हता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow