Chhatrapati Shivaji Maharaj : नेव्हीला बदनाम करू नका, चूक झाली असेल तर शासनाने माफी मागावी - सतेज पाटील

Aug 27, 2024 - 12:12
 0
Chhatrapati Shivaji Maharaj : नेव्हीला बदनाम करू नका, चूक झाली असेल तर  शासनाने माफी मागावी - सतेज पाटील

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते (Narendra Modi) आठ महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेला सिंधुदुर्ग (Sindhudurg) किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) कोसळने ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी घटना आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर आज वेदना होत आहेत, संताप होतोय. पुतळा तयार करताना योग्य खबरदारी घेतली नाही हे यावरून दिसतंय. उद्धघटन घाईसाठी अनुभव नसणाऱ्या लोकांना हे काम दिलं गेलं होतं. इव्हेंट करण्यासाठी इतकी गडबड केली गेली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार असं करतंय हे खरचं दुर्दैवी आहे.

देशात नेव्हीचा (Indian Navy) वेगळा इतिहास आहे. नेव्ही वर ढकलन म्हणजे नेव्हीचां अपमान करण्यासारखा आहे. त्यामुळे नेव्हीला बदनाम करू नका, चूक झाली असेल तर शासनाने माफी मागितली पाहिजे. सोबतच या घटनेची जबाबदारी घेऊन राज्य सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे.

चूक झाली असेल तर शासनाने माफी मागावी- सतेज पाटील

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण तात्काळ घटनास्थळाकडे गेले आहेत. मात्र, आता या पुतळ्याच्या उभारणीवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन या पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे होते, अशी माहिती दिली. तर, झालेली घटना दुर्दैवी असून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

अशातच आता शिवरायांच्या पुतळ्यावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील हे सारकारवर चांगलेच संतापले आहेत. आपटे नावाच्या व्यक्तीला हे काम देण्यासंदर्भात नेव्हीला कोणी सांगितलं, कोणत्याही शास्त्रात न बसणार नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं गेलं. चूक झाली असेल तर शासनाने माफी मागावी मात्र हे नेव्हीवर ढकलू नये. नेव्ही ला बदनाम करू नका. स्वतः च पाप दुसऱ्यावर ढकलण्याचं काम हे सरकार करतंय. असा घणाघात आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे.

हे महायुती नाहीतर महागळती सरकार- सतेज पाटील

पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले की, कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की पुन्हा उभारला जाणारा पुतळा हा महाविकास आघाडी कडूनच उभारला जावा. तर ती जबाबदारी आता आमचीच असेल. पुतळा उभा करताना एक नियमावली आहे. कला संचानलय या पुतळ्याची पाहणी आणि कामकाज पाहतं. परवानग्या देताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. हे महायुती नाहीतर महागळती सरकार आहे. संसद, राम मंदिर, विमानतळ या ठिकाणी गळतीच्या घटना घडल्या. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही पडला. ही तर संतापजनक आणि महाराष्ट्राला मागे नेणारी घटना आहे. असेही ते म्हणाले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 27-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow