लांजात अवैध धंद्यांविरोधी मोहीम

Aug 27, 2024 - 12:00
 0
लांजात अवैध धंद्यांविरोधी मोहीम

लांजा : लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी शहर व तालुक्यात चालणाऱ्या अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. गावठी दारू, मटका अशा अवैध धंदेवाल्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत केले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर बसलेल्या लांजा शहरात आणि तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. राजरोसपणे अवैध धंदे सुरू होते. तालुक्यासह शहरात चालणाऱ्या या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. या पार्श्वभूमीवर लांजा पोलिस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बगळे यांनी शहर व तालुक्यात अशा अवैध धंद्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या या कारवाईमुळे अशा अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दरम्यान, बगळे यांच्या या कारवाईचे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून स्वागत केले जात आहे. शहरासह तालुक्यातील अशा अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणीदेखील केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow