रानफुलांनी दिले गणेश आगमनाचे संकेत

Aug 27, 2024 - 12:53
 0
रानफुलांनी  दिले गणेश आगमनाचे संकेत

राजापूर : गणेशोत्सव पंधरा दिवसांवर आला असून गणेशाच्या आरासासाठी वापरल्या जाणाऱ्या निसर्गातील विविध पानह‌कुलांकडूनही गणेश आगमनाचे संकेत दिले आहेत. रानफुलांनी डवरलेल्या कातळातर रानतिरडा, सोनतळ, कळलावी, पांढऱ्या शुभ्र पानांची सारवाड, कवंडाल (जंगरली पडवल) सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून येत आहे.

निसर्गाची देणगी लाभलेल्या कोकणावर सध्या पावसामुळे निसर्गाने भरभरून उधळण केली आहे. श्रावणातील सौंदर्याची झलक सगळीकडे पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात काळे तुळतुळीत अन् शुष्क दिसणारे कातळ श्रावणात हिरवीगार शालू अंगावर पांघरून आहेत. त्या हिरव्या गालीचावर इवलीशी निळी, जांभळी, पांढरी रंगबेरंगी फुले साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. रानफुलांनी बहरलेल्या निसर्गामध्ये भुरुभुरु पडणान्या पावसामध्ये मध्येच आडवा येणारा इंद्रनुष्य निसर्ग सौंदर्याला चार 'बाँद' लावून जातो, आल्हाददायक वातावरण आणि दिवसागणिक सरत असलेल्या श्रावण महिन्यात बहरलेल्या रानफुलांकडून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे आता साऱ्यांना वेध लागले आहेत.

गणेशोत्सवात आरासासाठी विविध वनस्पती फुलांची आरास करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये विशेष करून पिवळ्या गडद रंगाच्या सोनतळीपासून तीन रंगाचा असलेला रानतिरडा, आयुर्वेदिक औषध म्हणूनही ज्याचा उपयोग केला जातो त्या कळलावी आदी पुलांचा समावेश आहे. जोडीला कवंडळ या फळासह केवळ हिरव्या आणि पांढऱ्या रंगांचे 'कलर कॉम्बिनेशन सलेल्या पानांच्या सारवडाचाही उपयोग केला जातो. गणेशोत्सवाच्या आरासासह सजावटीसाठी वापरण्यात येत असलेली ही रानफुले आणि वनस्पतींची पाने सध्या चांगलीच बहरली आहे. श्रावण महिन्यामध्ये बहरलेले हे निसर्गसौदर्य सध्या जणूकाही साऱ्यांच्या लाडक्या गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:15 PM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow