चिपळूण : टेरव येथील लिंगेश्वर मंदिर परिसराचा विकास होणार

Jul 3, 2024 - 13:27
Jul 3, 2024 - 13:34
 0
चिपळूण :  टेरव येथील लिंगेश्वर मंदिर परिसराचा विकास होणार

चिपळूण : श्री क्षेत्र टेरव, लिंगेश्वरवाडी येथील लिंगेश्वर मंदिरास आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नाने पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला. या देवस्थनास प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत निधी मिळावा म्हणून आ. निकम यांनी ग्रामविकासमंत्री यांना पत्राद्वारे विनंती केली होती. या पत्राची दखल घेऊन पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना लिंगेशवर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

येथील मंदिरास संरक्षण भिंत, बाबुराव कदम यांचे घर ते मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व संरक्षण भिंत बांधणे, धार्मिक विधीसाठी सभागृह, तलावासमोर उद्यान, जुन्या भिंतीची उंची वाढविणे, सहानेभोवती काँक्रिट करणे यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. यासाठी आ. निकम, सरपंच किशोर कदम, उपसरपंच, सदस्य यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच देवस्थानच्या प्रास्तावित कामांसाठी १.२५ कोटी, तर कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मंदिर विकास, सुशोभीकरण व गावचा विकास याकरिता ४.८५ कोटींचा भरघोस निधी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण विकास योजनेंतर्गत प्राप्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow