गुहागर : जिल्हा परिषद तळवली क्र. १ शाळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Aug 28, 2024 - 10:31
 0
गुहागर : जिल्हा परिषद तळवली क्र. १ शाळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

गुहागर : गेली अनेक वर्षे मोडकळीस आलेली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवली क्र. १ इमारतीला पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. त्यानंतर एक वर्षभर इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तसेच इमारतीच्या परिसरात बांधकामाचे साहित्य अस्ताव्यस्त आहे. ठेकेदार काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

शाळेची इमारत मोडकळीस आलेली असल्याने दोन वर्षांपासून तळवली मोठी बौद्धवाडी येथील समाज मंदिरामध्ये ही शाळा भरवली जात आहे. येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पवार व ग्रामस्थ राकेश पवार यांच्या विशेष प्रयत्नाने पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकामे सन २०२२- २३ मधून १७ लाखांचा निधी मंजूर करून आणला. त्यानंतर या शाळेचा ठेका मे. नवलाई मजूर सहकारी संस्था मर्यादित खोडदे, ता. गुहागर या मजूर संस्थेला मिळाला. दरम्यान, या मजूर संस्थेतील एकही पदाधिकारी अथवा संचालक येथील शाळा व्यवस्थापन समितीला भेटण्यासाठी अथवा कामाची पाहणी करण्यासाठी आले नाहीत. ठेका घेऊन काम वेळेत पूर्ण न केल्याबद्दल या मजूर संस्थेच्या विरोधात लवकरच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

इमारतीचे काम संबंधित मजूर संस्था पूर्ण करीत नसल्याने विद्यार्थ्यांना या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यास जाता येत नाही. या इमारतीचे उर्वरित लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow