राजकोट येथील घटनेचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकारण थांबवावे : नितेश राणे

Aug 28, 2024 - 11:05
 0
राजकोट येथील घटनेचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकारण थांबवावे : नितेश राणे

कणकवली : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय वेदनादायी होती. शिवरायांच्या पुतळ्याची ती अवस्था कोणच पाहू शकत नाही. दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

राजकोट किल्ल्यावर पुन्हा सरकार दिमाखात पुतळा उभारणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

आमदार सतेज पाटील यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी भूमिका घ्यावी. पुतळ्याच्या घटनेप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घाणेरडे राजकारण थांबवावे असेही राणे म्हणाले. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्या घटनेच विश्लेषण केल आहे. आणि पुढे काय होणार याचीही माहिती दिलेली आहे. आज सकाळी नौदलाची टीम पाहणी करुन गेली आहे. ही घटना राजकीय नाही. काँग्रेस, उबाठा या ठिकाणी येतात हे चुकीचे आहे. सतेज पाटील आले होते, विशाळगडवर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका शिवप्रेमींशी ही साजेशी आहे का ? एवढा त्यांना जर शिवरायांबद्दल आदर असता तर गडकिल्यांवर अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतली असती अशी टीका नितेश राणे यांनी यावेळी केली.

ठेकेदार व संबंधिताना अटक झाली पाहिजे

शिवप्रेमींनी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पहिले आम्ही शिवप्रेमी आहोत, नंतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत. शिवभक्त म्हणून आमची तीव्र भावना आहे, ठेकेदार व संबंधिताना अटक झाली पाहिजे. कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोणाची गय करणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिला.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow