'फेक नेरिटीव्ह' करणाऱ्या विरोधकांना उत्तर द्या : भाजप नेते रवींद्र चव्हाण

Aug 28, 2024 - 14:54
Aug 28, 2024 - 15:11
 0
'फेक नेरिटीव्ह' करणाऱ्या विरोधकांना उत्तर द्या : भाजप नेते रवींद्र चव्हाण

चिपळूण : लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकाकडून सोशल मीडियाद्वारे महायुती सरकारबद्दल 'फेक नेरिटीव्ह' पसरवले. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्याची माहिती चिपळूणचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी दिली.

भाजपच्या चिपळूणमधील शिष्टमंडळाने नुकतेच मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात माहिती देताना ताम्हणकर म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूणमध्ये भाजपचा उमेदवार असेल की नाही, हे आता सांगता येणे शक्य नाही; मात्र महायुतीचा उमेदवार दिल्यानंतर त्याला निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा, अशा सूचना आम्हाला पक्षाकडून आल्या आहेत

तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी राबवल्या जात आहेत. त्या योजनांची माहिती प्रत्यक्ष लोकांना होण्याच्यादृष्टीने बूथ यंत्रणेने काम करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपबद्दलचा जनाधार वाढला आहे; परंतु या मतदारसंघात सक्षम बूथ यंत्रणेअभावी अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे बूथ प्रमुखांनी केंद्राच्या योजना, त्याची माहिती आपापल्या बूथमधील मतदारापर्यंत पोहोचवून त्यांचे मतदान आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात निधी किती आला, कामे किती झाली यापेक्षा झालेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. संविधान धोक्यात आल्याची अफवा पसरवण्यात विरोधक यशस्वी ठरल्यामुळे लोकसभेत काही मते महाविकास आघाडीला मिळाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow