एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेमध्ये ७९ हजारांची चोरी

Aug 28, 2024 - 11:06
Aug 28, 2024 - 16:08
 0
एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेमध्ये ७९ हजारांची चोरी

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेमधून प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या बॅगेमधील ७९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळवला. या प्रकरणी राजापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ जुलैला सकाळी पावणेनऊच्या सुमारास राजापूर रेल्वेस्टेशनदरम्यान निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना चोरट्याने ते झोपी गेल्याचा फायदा घेऊन राजापूर रेल्वे स्टेशनदरम्यान त्यांच्या बॅगेमधील ६० हजाराचा लॅपटॉप, १३ हजाराचा टॅब आणि ५ हजाराचे हेडफोन, १ हजाराची पॉवर बँक, १० रुपयांचा चार्जर असा ७९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पळविला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:33 PM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow