रत्नागिरी शहरातील २० सीसीटीव्ही कॅमेरे बंद

Aug 29, 2024 - 12:46
Aug 29, 2024 - 12:53
 0
रत्नागिरी शहरातील २० सीसीटीव्ही कॅमेरे बंद

रत्नागिरी : शहरातील चंपक मैदान येथे एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर रत्नागिरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील एकूण ५७ पैकी २० कॅमेरे बंद असल्याचे तपासणीव निष्पन्न झाले आहे. काही ठिकाणी केवलमधील तांत्रिक त्रुटींमुळे कॅमेरे बंद आहेत तर काही ठिकाणी विद्युत पुरवठा होत नाही. स्ट्रीटलाईटवरून काहींना जोडणी दिल्यामुळे ते फक्त स्ट्रीटलाईट लागल्यानंतर सुरू होतात. प्रत्येक कॅमेऱ्यासाठी स्वतंत्र मीटर घेणे शक्य नाही; परंतु त्यावर लवकरच पर्याय काढला जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

रत्नागिरीत सोमवारी एका तरुणीचा लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला. ती तरुणी साळवी स्टॉप येथे बसमधून उत्तरली. तिथुन वी चार च पाच किलोमीटर अंतरावर चंपक मैदानावर बेशुद्धावस्थेत सापडली ती तिथपर्यंत कशी पोहोचला याचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही हा सर्वात उत्तम पर्याय आहे, मात्र, पोलिसांनी शहरात बसवलेल्या सीसीटीव्हीपैकी साळवी स्टॉप येथील कॅमेरा बंद होता.
त्यामुळे तेथील माहिती मिळालेली नाही.

शहरातील सीसीटीव्हीविषयी जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सत्नागिरीमध्ये ५७ सीसीटीव्ही बसवले होते. वारा-पाऊस यामुळे काही सीसीटीव्हीची फायबर केबल तुटली आहे. सीसीटीव्हीसाठी आवश्यक विद्युत पुरवठ्याची व्यवस्था स्वतंत्रपणे केलेली नाही. रत्नागिरी पालिकेच्या पथदीपावरून वीजपुरवठा घेतलेला आहे; मात्र, पथदीप फक्त रात्रीच सुरु असतात, त्यामुळे हा पर्याय फारसा उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे ५७ पैकी २० सीसीटीव्ही बंद आहेत. सध्या ३७ सीसीटीव्ही चालू आहेत. बंद कैमेरे सुरू ठेवण्यासाठी पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व सीसीटीव्ही कार्यरत होतील.

तपासकामात अडथळा नाही
पोलिसांनी बसवलेले सीसीटीव्ही बंद असले तरीही लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आवश्यक सीसीटीव्ही फूटेज प्राप्त झालेले आहे. त्यामुळे तपासकामात कोणतीही अडचण येणार नाही, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

एक कोटी रुपये खर्च करून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत; परंतु देखभाल दुरुस्तीचा प्रश्न कायम आहे. २४ तास शहरावर कॅमेऱ्याची नजर राहावी, हा उद्देश आहे. त्यामुळे पोलिसदलाकडून पर्याय काढला जात आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow