रत्नागिरी : कुर्ली येथे राहत्या घरी तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Aug 30, 2024 - 10:51
 0
रत्नागिरी : कुर्ली येथे राहत्या घरी तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी : शहरानजिकच्या कुर्ली येथे तरुणाने राहत्या घरी अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12.45 वा. सुमारास उघडकीस आली.

बहर नरेंद्र तोडणकर (34,रा. कुर्ली, रत्नागिरी ) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी कुर्ली येथील विजपुरवठ्या संबंधी महावितरणचे कर्मचारी बहरच्या घरी गेले होते. तेव्हा घराचा दरवाजा कोणीही उघडत नव्हते. त्यामुळे आजूबाजुच्या शेजाऱ्यांनी बहरच्या छोट्या भावाला जो आई-वडिलांसह नोकरीनिमित्त गुजरातला असतो त्याला फोन केला. त्याने घराचा दरवाजा तोडून पहा असे त्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा फोडला असता त्यांना बहर घरातील लोखंडी पाईपला वायरने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली असून उत्तरीय तपासणीसाठी बहरचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow