रत्नागिरी : बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये गणेशोत्सवानिमित्त आजपासून मोदकनिर्मिती प्रशिक्षण

Aug 30, 2024 - 10:49
 0
रत्नागिरी : बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये गणेशोत्सवानिमित्त आजपासून मोदकनिर्मिती प्रशिक्षण

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे महिला आणि विद्यार्थिनींसाठी येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत मोदक तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात पारंपरिक मोदकांबरोबर विविध १५ प्रकारचे मोदक तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांसहित शिकवले जाणार आहेत. साहित्य आणि कृतीच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षण सशुल्क असून साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी येथील केंद्रात याचे प्रशिक्षण होणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त महिलांनी विविध प्रकारचे मोदक घरच्या घरी प्रसादासाठी बनवावेत तसेच व्यवसाय म्हणून नवीन सुरुवात करावा, या उद्देशाने शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला जास्तीत जास्त महिला आणि विद्यार्थिनींनी प्रवेश घेऊन प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महिलांसाठी विविध प्रकारचे फूड प्रोसेसिंग, ब्युटी पार्लर, फॅशन डिझाइन आदी व्यावसायिक प्रशिक्षण महिलांना देऊन त्यांना स्वावलंबी होण्यास सहकार्य करत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow