मुंबईत धक्कादायक निकाल; उज्वल निकम पराभूत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय खेचून आणला

Jun 4, 2024 - 16:52
Jun 4, 2024 - 16:54
 0
मुंबईत धक्कादायक निकाल; उज्वल निकम पराभूत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय खेचून आणला

मुंबई : त्तर मध्य मुंबईत प्रसिद्ध वकिल उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात सामना होता. भाजपाने या मतदारसंघातून पूनम महाजन यांचा पत्ता कापला व त्यांच्याजागी उज्वल निकम यांना उमेदवारी दिली.

भाजपाने अखेरच्या क्षणी उज्वल निकम यांना उमेदवार बनवलं. महाविकास आघाडीत काँग्रेसकडे हा मतदारसंघ आला. काँग्रेसने इथून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. मागच्या दोन टर्मपासून उत्तर मध्य मुंबईच्या मतदारांनी पूनम महाजन यांना साथ दिली होती. यावेळी उत्तर मध्य मुंबईत 51.98 टक्के मतदान झालं. 2019 मध्ये इथे 53 टक्के मतदान झालं होतं.

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे उज्वल निकम हे पराभूत झाले आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. सुरुवातीला उज्वल निकम यांच्याकडे मोठी आघाडी होती.

उत्तर मध्य मुंबईत वांद्रे पूर्वेचा मध्यमवर्गीय झोपडपट्टीधारक मतदार आहे. त्याचवेळी वांद्रे पश्चिमेचा हाय प्रोफाइल मतदार सुद्धा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या भागात राहतात. 17 लाखापेक्षा जास्त मतदार या मतदारसंघात आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात मराठी मतदारांबरोबरच दलित आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. मुस्लिम मतदारांचही प्राबल्य आहे. उत्तर भारतीय मतदार कोणाच्या बाजूने जाणार? त्यावरही जय-पराजयाच गणित ठरणार आहे.

उमेदवाराचे नाव आघाडी-पिछाडी निकाल
वर्षा गायकवाड (काँग्रेस) - विजयी
उज्वल निकम (भाजपा) - पराभूत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:58 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow