रत्नागिरी : 'कोरे' प्रकल्पग्रस्तांना भरतीत नोकऱ्या न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

Aug 31, 2024 - 12:45
 0
रत्नागिरी : 'कोरे' प्रकल्पग्रस्तांना भरतीत नोकऱ्या न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या विविध श्रेणीच्या पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली असून, त्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. यामध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्रथम प्राधान्य देऊ, असे सांगूनही प्रकल्पास्तेतर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. याचाच अर्थ कोकण रेल्वेभरतीत नेहमीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या आहेत. १०० टक्के प्रकल्पास्तांना नोकरी मिळण्याची मागणी मान्य न झाल्यास कोकण भूमी प्रकल्पास्त शेतकरी रेल्वे ट्रॅकवर आंदोलनात उत्तरेल, असा इशारा कृती समितीने दिला आहे.

कोकण रेल्वेच्या निवडप्रक्रियेसंबंधी प्रकल्पास्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष विनय मुकादम, सचिव अमोल सावंत आणि सहसचिव प्रभाकर हातणकर यांनी सांगितले, कोकण रेल्वेने शेतकऱ्यांच्या जमिनी १९८९-९० मध्ये कवडीमोल दराने म्हणजे १५० रुपये प्रतिगुंठा या दराने विकत घेतल्या.

आता त्या जमिनीची किमत गुंठ्याला दहा लाख रुपये आहे. अर्थमंत्री मधु दंडवते व रेल्वेमंत्री जॉर्ज फनांडिस यांनी भूमिपुत्रांच्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला विनाअट कोकण रेल्वेमध्ये नोकरीत घेऊ, असे जाहीर केले होते. १९९६ नंतर ते धोरण बदलल्यामुळे आजतागायत प्रकल्पास्तांवर अन्याय होत आहे.

यापूर्वी कृती समितीने अनेकदा पत्रव्यवहार, भेट घेऊन चचर्चाही केली. यावर्षी फेब्रुवारीत चर्चा करण्याबाबत संयुक्त बैठक होणार होती, पण ती झाली नाही, अशी खंत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गेल्या ३६ वर्षात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतलेले नाही, ही शोकांतिका आहे.

२५०० पदे रिक्त होणार
२०२७ पर्यंत सुमारे २५०० पदे रिक्त होणार असल्यामुळे कोकण रेल्वेआधी भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण न करता ही प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातूनच भरावीत, अशी मागणीही समितीने आहे. प्रकल्पग्रस्तांची परीक्षा न घेता योग्य प्रशिक्षण देऊन नियुती द्यावी. प्रकल्पग्रस्तांनी यापूर्वीही परीक्षा दिल्या होत्या; परंतु अनेक उमेदवारांना डावले. त्यांना नियुक्ती द्यावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow