विनायक राऊत आज चिपळुणात
![विनायक राऊत आज चिपळुणात](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_666fc52db4505.jpg)
चिपळूण : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची कायम पाठराखण करणारे कोकणातील माजी खासदार विनायक राऊत आणि अनंत गीते हे दोन ज्येष्ठ शिलेदार लोकसभेच्या लढाईत मात्र विजयी होऊ शकले नाहीत. मात्र, त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत सोमवारी (ता. १७) चिपळूणला येणार आहेत.
२० तारखेनंतर अनंत गीतेही आभार दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेऊन विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वातावरण यापुढेही कायम टिकून राहावे, यासाठी शिवसेनेचे हे दोन्ही माजी खासदार पराभवानंतरही कोकणात दौरे करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 17-06-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)