रत्नागिरी : पाली येथील डी. जे. सामंत महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

Aug 31, 2024 - 14:01
 0
रत्नागिरी : पाली येथील डी. जे. सामंत महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

पाली : रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांता कांबळे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये खो- खो, कबड्डी, लंगडी, कॅरम, बुद्धिबळ यासारख्या खेळांचे सामने घेण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून खेळाचे महत्त्व पटवून दिले. आपल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ किती महत्त्वाचे आहेत याबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दीपाली कीर यांनी केले. तसेच क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा विभागप्रमुख प्रा. प्रतीक कांबळे, सहा. प्रा. दीपाली कीर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow