संगमेश्वर : माखजन आठवडा बाजारात कोसळला वृक्ष

Sep 2, 2024 - 10:45
 0
संगमेश्वर : माखजन आठवडा बाजारात कोसळला वृक्ष

संगमेश्वर : संगमेशवर तालुक्यातील माखजन येथे आठवडा बाजारच्या ठिकाणी तो वृक्ष दोन दुकानांच्या मधोमध पडल्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. हा प्रकार शनिवारी संध्याकाळी घडला. 

माखजन येथे शनिवारी आठवडा बाजार भरतो. हा आठवडा बाजार माखजन बाजारपेठेतून सरंद रस्त्यावर भरतो. नेहमीप्रमाणे बाजार भरलेला असतानाचा झाड कोसळले मोठा आवाज झाल्यामुळे बाजारात आलेल्या लोकांमध्ये गोधळ उडाला होता. रस्त्याच्या शेजारी थाटलेल्या दोन दुकानच्या बरोबर मध्ये झाड पडले. या घटनेत सुदैव कुणाला दुखापत झाली नाही. मात्र झाड पडल्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. या भागात गडनदीचे पाणी भरत असल्याने येथील जमीन उमलली आहे. त्यामुळे हे झाड उन्मळून पडले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिसरात असलेले अन्य मोठे वृक्ष देखील धोकादायक झाले आहेत. प्रशासनाकडून वेळीच त्याची चाचपणी होणे गरजेचे आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow