संगमेश्वर : मोटारींच्या अपघातात नावडी येथील चालक गंभीर जखमी

Sep 2, 2024 - 10:33
 0
संगमेश्वर :  मोटारींच्या अपघातात नावडी येथील चालक गंभीर जखमी

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली येथे पिकअप व्हॅन आणि मोटार यांच्यातील अपघातात मोटारीचा चालक जखमी झाला. दिलशाद अन्सारी (नावड़ी) असे जखमी चालकाचे नाव आहे. त्याला डेरवण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पिकअप चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात काल सकाळी आठच्या सुमारास झाला.

विशाल सटवाजी कोळे (वय २५, कांदिवली) हा पिकअप घेऊन गोवा फोंडा येथे जात होता. आरवली घाट येथे समोरून येणारी मोटारीची समोरासमोर धडक झाली. मोटारीचे चालक दिलशाद अन्सारी (४८) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना डेरवण येथील खासगी दवाखान्यात उपचारांसाठी हलवले आहे. अपघाताची माहिती मिळताच माखजन पोलिस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक विवेक साळवी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूंची वाहतू‌क सुरळीत केली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक साळवी करत आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow