रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळावा आज
रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टिने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळाव्याचे आयोजन ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, एम.आय.डी.सी. मिरजोळे रोड येथे करण्यात आलेले आहे.
मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थाकडील विविध अडीच हजारपेक्षा अधिक पदांसाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यात येणार आहे. या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 03-09-2024
What's Your Reaction?