लोकशाही आणि राज्यघटना टिकविण्यासाठी हिंदूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची - ॲड. सचिन रेमणे

Sep 3, 2024 - 09:57
 0
लोकशाही आणि राज्यघटना  टिकविण्यासाठी हिंदूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची - ॲड. सचिन रेमणे

रत्नागिरी : आगामी निवडणुकीत लोकशाही आणि राज्यघटना टिकविण्यासाठी हिंदूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता सचिन रेमणे यांनी केले.

विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमात्ताने देशभर २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात तालुका स्तरावर व्यापक हिंदू संमेलने आयोजित केली होती. रत्नागिरी ग्रामीण प्रखंडाचे संमेलन पाली येथील श्री स्वामी समर्थ उपासना केंद्रात झाले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अॅड. रेमणे बोलत होते. त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेचा उद्देश, त्यामुळे देशातील आणि जगातील हिंदू बांधवांची जागृत झालेली धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मिता, विविध धार्मिक अभियाने, श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलन, रामसेतू आंदोलन, विश्व हिंदू परिषदेमार्फत विविध आयामाद्वारे होत असलेले सामाजिक आणि धार्मिक कार्य, सेवाकार्ये, विश्व हिंदू परिषदेचे नियोजित कार्य, हिंदू समाजाची संघटना मजबूत होण्याची आवश्यकता, हिंदू समाज आणि संस्कृतीसमोर असलेली आव्हाने, बांग्लादेशातील हिंदूंना आवश्यक असलेली मदतीची भूमिका, या परिस्थितीत भारतीय हिंदू समाजाने करायची तयारी अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow