रत्नागिरी : 'उत्पादन शुल्क'ची ११ कोटींची इमारत मंजूर

Sep 3, 2024 - 11:36
Sep 3, 2024 - 12:04
 0
रत्नागिरी : 'उत्पादन शुल्क'ची ११ कोटींची इमारत मंजूर

रत्नागिरी  : राज्याला सर्वात जास्त महसूल देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आजही ब्रिटिशकालीन जुन्या इमारतीतून जिल्ह्याचा कारभार हाकावा लागतो. यापूर्वी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये काही त्रुटी निघाल्याने हा प्रस्ताव मागे आला. आता सुधारित इमारतीच्या ११ कोटीच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली असून, कामाची निविदा प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे लवकरच राज्य उत्पादन शुल्क विभाग आलिशान दोनमजली इमारतीत उभारले जाणार आहे. 

१८७८ च्या स्थापनेपासून आतापर्यंत ब्रिटिशकालीन इमारतीतच आहे. सुमारे ४ एकरची ही जागा असून त्यामध्ये अनेक विभाग आणि जप्त केलेली वाहने, मुद्देमाल आहे. राज्याच्या महसूल उत्पन्नामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या या विभागाला सुसज्ज इमारत नसल्याने अधिकाऱ्यांना बसण्यासाठी ही पुरेशी जागा उपलब्ध नाही. अधिकारी, कर्मचारी असलेल्या जेमतेम जागेचा पुरेपूर वापर करून काम करत आहेत.

काही वर्षांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीचे १२ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते परंतु कोरोनाच्या लाटेमुळे निधीला विलंब झाला तसेच त्यामध्ये काही त्रुटी निघाल्या, नव्याने या इमारतीचे अंदाजपत्रका करण्यात आले. नव्या इमारतीत अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यालये असणार आहेत याशिवाय चार भरारी पथके, कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र विभाग, जात मुद्दमाल ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग अशी चारमजली इमारतीची रचना आहे. राज्य सरकारने निधीला मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक सागर धोमकर हे याचा पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या काळात इमारतीचा प्रस्ताव मागों लागावा म्हणून त्याचा प्रयत्न होता; परंतु त्यांची बदली झाली. या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन ११ कोटीच्या जी प्लस वन अशा राज्यात या विभागाच्या असलेल्या एकसारखा ढाचा ही इमारत उभारण्यात येणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. याची निविदा प्रक्रिया झाली असून लवकरच माती परीक्षण करून बांधकामाला सुरुवात केली जाईल. - कीर्ती शेडगे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow