कोकणातील रिफायनरी होणार कधी : अॅड. विलास पाटणे

Jul 12, 2024 - 11:50
Jul 12, 2024 - 11:52
 0
कोकणातील रिफायनरी होणार कधी  : अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : कोकणात रिफायनरी उभारण्यावरून गोंधळ सुरू असतानाच मछलीपट्टम येथे साठ हजार कोटी खर्च करून भारत पेट्रोलियम रिफायनरी उभारणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे. तसे असेल तर कोकणातील प्रकल्प केव्हा होणार, असा प्रश्न अॅड. विलास पाटणे यांनी उपस्थित केला आहे. कोकणातील तुरुणांनीभ विष्याची स्वनं या रिफायनरीत शोधली तरच तीन लाख कोटी गुंतवणुकीचा आणि दीड लाख पेट रोजगार निर्माण करणारा रिफायनरी प्रकल्प राजापुरात नक्की अवतरेल, असेही पाटणे यांनी सांगितले.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू यांना आंध्रप्रदेश येथे चार वर्षांत रिफायनरी प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासन दिले. त्यासाठी ३ हजार एकर मछलीपट्टणच्या जमीन आसपास उपलब्ध करून दिली जाऊ शकते. रिफायनरी उभारण्यासाठी मछलीपट्टणम योग्य असल्याचेही पुढे आले आहे. बीपीसीएलने रिफायनरी कंपनी मछलीपट्टण येथे सुरू केल्यास स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. रिफायनरीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची तयारीही आंध्रप्रदेश सरकारने केल्याचे समजते, आंध्रप्रदेश येथील रिफायनरीसाठी प्रयत्न सुरू असतानाच बारसू (राजापूर) रिफायनरीला तीन ते चार वर्षे विलंब झाला आहे. या परिस्थितीमध्ये तातडीने स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिटयूटसह रिफायनरी सुरु करण्याची गरज आहे. यासाठी राजकीय पक्षांची भूमिका महत्वाची ठरेल. रिफायनरीसाठी नियोजित जमीन ही ७० टक्के कातळ व पडजमीन होती. जमीन संपादनाला ८६ टक्के जमीन मालकांनी कोणताही विरोध नव्हता. सव्वाशे गावातील शेतकऱ्यांनी व ७५ संघटनांनी रिफायनरीला समर्थन दिले आहे. या उलट ८ हजार एकर क्षेत्राच्या मालकांनी प्रकल्पांच्या समर्थनार्थ लेखी संमती दिली आहे, असे अॅड. पाटणे यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow