गणेशोत्सवात मध्यरेल्वेचे दोन ब्लॉक

Sep 3, 2024 - 12:03
 0
गणेशोत्सवात  मध्यरेल्वेचे दोन ब्लॉक

खेड : एन गणेशोत्सवाच्या तोंडावर येत्या आठवड्यात दक्षिण रेल्वे आणि मध्यरेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वेमार्गावर ब्लॉक नसला तरी या दोन्ही विभागांतून कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे.

मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी-भुसावळ विभागात लूपलाइनच्या विस्ताराचे काम हाती गेले असल्याने खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. ४ सप्टेंबरला प्रवास सुरू करणारी वास्को दी गामा पाटणा एक्स्प्रेस आणि ५ सप्टेंबरची मडगाव जं. नागपूर विशेष या दोन्ही गाड्यांचा वेग मध्यरेल्वे विभागात १ तास ३० मिनिटे नियमित केला वाचबरोबर दक्षिण रेल्वेच्या अंगमाली यार्डमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेने घेतला आहे. या कारणास्तव दक्षिण रेल्वेच्या काही गाडांवर परिणाम होणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर दक्षिण रेल्वे आणि मध्यरेल्वेने दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

चाकरमान्यांची कोकणात येण्यासाठी कसरत सुरू असतानाच रेल्वेमार्गावर ब्लॉक असल्यामुळे गाड्या उशिरा धावणार आहेत. या कालावधीत मोठ्या प्रमाणात जादा गाड्या सोडण्यात येतात. त्यामुळे आधीच वेळापत्रकावर परिणाम होत असतो. त्याचवेळी हा ब्लॉक घेतला तर त्यामध्ये आणखी प्रवाशांची अडचण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow