Breaking : हवाई दलाचं मिग 29 विमान कोसळलं

Sep 3, 2024 - 12:03
 0
Breaking : हवाई दलाचं मिग 29 विमान कोसळलं

नवी दिल्ली : हवाई दलाचं (Indian Air Force) मिग 29 विमान (Mig 29 Aircraft) कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील (Rajasthan News) बारमेरमध्ये (Barmer) हवाई दलाचे (Air Force) मिग 29 विमान कोसळलं आहे.

ज्यामध्ये पायलट सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हे लढाऊ विमान कोसळलं आणि विमानाला मोठा स्फोट होऊन आग लागली आहे.

लोकवस्ती नसलेल्या भागात हा अपघात झाला. त्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे. बाडमेरचे जिल्हाधिकारी निशांत जैन, एसपी नरेंद्र सिंह मीना आणि जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या दुर्घटनेत सुदैवानं वैमानिक सुखरूप बचावल्याचं हवाई दलानं एक निवेदन जारी करत सांगितलं आहे.

हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटनुसार, "बाडमेर सेक्टरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान, IAF मिग-29 मध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे पायलटला विमानातून बाहेर पडावं लागलं. पायलट सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही, कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत."

एसपी नरेंद्र सिंह मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेर उतरलाई एअरबेसजवळ हा भीषण अपघात झाला. मिग-29 अपघाताला बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा मिग-29 विमान कोसळल्याचे अपघात झाले आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow