लांजा : रिंगणे - कोंडगाव येथील २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

Sep 5, 2024 - 10:39
Sep 5, 2024 - 12:58
 0
लांजा :  रिंगणे - कोंडगाव येथील २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

लांजा : मेहंदीची ऑर्डर असल्याने लांजा येथे जात आहे, असे सांगून घराबाहेर पडलेली लांजा तालुक्यातील कोंडगाव येथील २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनी लांजा पोलिस ठाण्यात दिली आहे.

या संदर्भात लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाहीर अब्बास मापारी (वर्षे, रा. रिंगणे- कोंडगाव, ता. लांजा) यांनी लांजा पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यानुसार मुलगी शिफा जाहीर मापारी (२२ वर्षे) ही मंगळवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान झर्ये- रत्नागिरी या एसटी बसने लांजा येथे मेहंदीची ऑर्डर आहे, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, ती सायंकाळी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिची नातेवाईक व अनेक ठिकाणी शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नसल्याने वडील जाहीर मापारी यांनी लांजा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

या बाबत अधिक तपास निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जान्हवी मांजरे या करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow