खेड पोलिस ठाण्यासमोरच वाहतूककोंडी

Sep 5, 2024 - 14:03
 0
खेड पोलिस ठाण्यासमोरच वाहतूककोंडी

खेड : पोलिस ठाण्यासमोरच होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हॉटेल कॅफे कॉर्नरनजीकच्या अरूंद वळणासह पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. शहरात आधीच वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतूककोंडीने कहर केला आहे. सतत होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पडलेले खड्डे बुजवण्याची तसदी अजूनही नगरपालिकेने घेतलेली नाही.

शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. केवळ मोजक्याच ठिकाणचे खड्डे बुजवत मार्ग सुस्थितीत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. हॉटेल कॅफे कॉर्नरनजीक शिवतर रोडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचालकांना वळण घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात खड्डे पडल्याने व लगतचा मार्गही एका बाजूने खचत असल्याने समस्येत भर पडली आहे. काही वाहनचालक बेदरकारपणे वाहने हाकत असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow