संगमेश्वर : कडवई बाजारपेठेतील स्वच्छतागृह निरुपयोगी

Aug 2, 2024 - 11:25
 0
संगमेश्वर : कडवई बाजारपेठेतील स्वच्छतागृह निरुपयोगी

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत हद्दीतील बाजारपेठ येथे असणारे सार्वजनिक स्वच्छतागृह हे जाण्या- येण्यासाठी रस्ताच नसल्याने, असून अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे.

कडवई बाजारपेठेत आजूबाजूच्या दहा गावांतून लोक विविध कामांसाठी येत असतात. या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजारपेठेत कडवई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चार लाख रुपये खर्च करून दहा वर्षांपूर्वी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले. मात्र, स्वच्छतागृहात जाण्यासाठी रस्ता करण्यात आला नाही. तरीही लोक ये-जा करत होते; मात्र याच स्वच्छतागृहाच्या बाजूला करकरे यांच्या मालकीची विहीर असून, लोक या जागेत घाण करू लागले. त्यामुळे करकरे यांनी खासगी जागेतील विहिरीला तीन वर्षांपूर्वी बंधिस्त कम्पाउंड केले. त्यामुळे स्वछतागृहाकडे जाण्याचा रस्ता बंद झाला. 

जागामालकांनी सार्वजनिक हितासाठी रस्ता देण्याची तयारी दर्शवली; मात्र त्यासाठी सरंक्षण भिंतीची मागणी केली. तसा ठरावही ग्रामसभेत करण्यात आला; मात्र त्याची अमंलबजावणी झाली नाही. त्यामुळे हे स्वच्छतागृह असूनही जाण्यासाठी रस्ता नसल्याने निरुपयोगी आहे. त्यामुळे ग्रामस्थांची विशेषतः महिलांची गैरसोय होत आहे. सरपंच विशाखा कुवळेकर यांनी या बाबीकडे गांभीयनि लक्ष घालून तत्काळ स्वछतागृहाची व्यवस्था करून महिलांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow