संगमेश्वर : सायले-देवरूख रस्त्याची दुर्दशा

Sep 5, 2024 - 15:25
 0
संगमेश्वर : सायले-देवरूख रस्त्याची दुर्दशा

देवरुख : सायले पंचक्रोशीतील नागरिकांनी सतत केलेली मागणी आजवर दुर्लक्षित राहिल्याने सायले देवरूख या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

या खड्यातून वाहने चालवणे खूपच धोकादायक बनले आहे. मध्यंतरी आवाज उठवल्यानंतर काही ठिकाणी खडीचा वापर करून खड्डे बुजवण्याचे काम देवरूख, ओझरेपर्यंतच करण्यात आले; परंतु त्यापुढील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. गणेशोत्सवाची धामधूम सुरू होईल. या रस्त्यावर वाहनांची सतत ये-जा होणार आहे, हे लक्षात घेऊन संबंधित अधिकारी वगनि खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करायला हवे. कोणत्याही सरकारी कारणांचा पाढा वाचून या कामाला स्थगिती देऊ नये.

'पंचक्रोशीचा राजा' या मंडळाने या आधी अशाच स्वरूपाची मागणी केली होती. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जाणार नसेल, तर संबंधित अधिकारीवर्गाला जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow