सर्वंकष विद्या मंदिरच्या आर्या करकरेची विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी : येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सर्वंकष विद्यामंदिर रत्नागिरीची विद्यार्थिनी आर्य करकरे हिने यश संपादन केले असून तिची विभागस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेच्यावतीने तिला शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे नुकत्याच शालेय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विद्यार्ध्यांनी सहभाग घेतला होता. १४ वर्षांखालील मुली या गटात सलग ७ फेऱ्यांमध्ये विजय मिळवत आर्या करकरे हिने उज्ज्वल यश संपादन केले. तिची विभाग स्तरासाठी निवड झाली आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मोनिका जयस्वाल यांनी शाळेच्यावतीने आर्याचे अभिनंदन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 05-09-2024
What's Your Reaction?