कशेडी बोगद्यांमुळे प्रवास ४५ ऐवजी ८ मिनिटांत

Sep 9, 2024 - 16:20
 0
कशेडी  बोगद्यांमुळे प्रवास ४५ ऐवजी ८ मिनिटांत

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी येथील दुसरा भुयारी मार्ग सुरू झाल्यामुळे घाटमार्गे रस्त्यावरून जाण्याचे ४५ मिनिटांचे अंतर अवघ्या आठ मिनिटांत पार केले जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या वेळेची बचत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून दोन्ही भुयारी मार्गावर वाहतूक पोलिसांची गस्त ठेवली असल्यामुळे वाहतूक कोंडी टळली आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पळस्पे, पनवेल तर पोलादपूरच्या कशेडी मार्गाला पर्यायी भुयारी मार्गापर्यंत महामार्ग पाहणी दौरा केला. त्यानंतर ३ सप्टेंबरपर्यंत दुसरा भुयारी मार्ग सुरू करण्याचे संकेत दिले. प्रत्यक्षात हरितालिकेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरूवारी (ता. ५) वाहतूक सुरू झाली आहे. पहिल्या भुयारी मार्गावर अपघात झाल्यानंतर नितांत आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्वरित दुसरा भुयारी मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी खुला केल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले. भुयारी मार्गामुळे कशेडी घाटातील रस्त्यावरून जाण्याचे ४५ मिनिटांचे अंतर अवघ्या आठ मिनिटात पार केले जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या वेळेची बचत होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून दोन्ही भुयारी महामार्गाच्या  रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कातळी भोगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी भागात दोन्ही बाजूंना आवश्यक ती यंत्रसामुग्री तैनात ठेवली आहे. तसेच कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राकडूनही बोगद्याच्या प्रवेशद्वाजवळील काही अंतरापासून तालुक्यातील खवटी व पोलादपूर हद्दीतील भोगाव येथे पोलीस कर्मचारी गस्त घालत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी टळली आहे.

कामे अर्धवट
भुयारातील संरक्षक कठड्यांच्या स्टीलच्या जाळ्यांवर काँक्रिट ओतण्यात आले आहे. त्यावेळी भुयारावरील भागातील स्टीलच्या जाळ्यांवर सिमेंट काँक्रिटचे फोमिंगचे काम चालू होते, तर भुयाराच्या तोंडापाशी जमलेला डोंगरावरील लालमातीचा चिखल पोलेनने उकरून काढल्या जात होता. अनेक ठिकाणी कॉक्रिटीकरणाचे काम अर्धवट ठेवलेले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:47 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow