राजापूरमध्ये वन्यजीवांवर उपचारासाठी जिल्ह्यातील पहिले प्राथमिक उपचार केंद्र

Sep 9, 2024 - 16:53
 0
राजापूरमध्ये  वन्यजीवांवर उपचारासाठी जिल्ह्यातील पहिले प्राथमिक उपचार केंद्र

राजापूर : पश्चिम घाटाच्या विविधांगी वनसंपदेचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जंगल परिसरामध्ये विविध दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांचे वास्तव्य आढळले आहे. विविध कारणास्तव जखमी होणाऱ्या या वन्यजीवांवर तत्काळ प्राथमिक उपचार करता यावेत या दृष्टीने राजापूर तालुक्यामध्ये वनविभागातर्फे 'वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्रा'ची उभारणी करण्यात येणार आहे. राजापुरात उभारले जाणारे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्र ठरणार आहे.

वनविभागाच्या जागेमध्ये हे प्राथमिक उपचार केंद्र उभारण्याला प्राधान्य देण्यात येणार असून, त्यामध्ये शहरानजीकच्या धोपेश्वर येथील सुमारे २३ हेक्टर क्षेत्र विचाराधीन आहे; मात्र अपेक्षित असलेली मुबलक वा विस्तीर्ण प्रमाणात जागा वनविभागाकडे उपलब्ध न झाल्यास महसूल विभागाकडून जागा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्राथमिक उपचार केंद्रातील नियोजन अन् सोयी-सुविधांसह तांत्रिक बाबीच्या उभारणीसाठी सुमारे दीड कोटी रुपयांची आवश्यकता असून, प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. विविध कारणांमुळे जखमी होणाऱ्या वन्यजीवांवर तत्काल उपचार करणे गरजेचे असते विशेषतः वन्यप्राण्यांवर उपचार करतील कमीत कमी मानवी संपूर्ण व तातडीने उपचार करून त्यांना लवकरात लवकर अधिवासामध्ये सोडवावे लागते उपचारांसाठी वेगळ्या सुविधांची आवश्यकता असते. सद्यस्थितीमध्ये जखमी वन्यजीवांवर उपहार करण्यासाठी पशुवैद्यकीय आहे.

दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. या साऱ्या गोष्टी विचारात घेऊन वनविभागातर्फे वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्राची राजपुरात उभारणी केली जाणार आहे. या केंद्राचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लगतच्या कोल्हापूर जिल्हा पण उपयोग होणार आहे. 

जखमी झालेल्या वन्यप्राणी-पक्षी यांसह अन्य वन्यजीवांवर अनेकवेळा तत्काळ प्राथमिक उपचार करणे गरजेचे असते; मात्र तथा सुविधा उपलब्ध नसल्याने तत्काळ उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे राजापूर तालुक्यामध्ये सर्व सोयी-सुविधांनीयुक्त वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्राची उभारणी केली जाणार आहे त्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. -- गिरिजा देसाई, विभागीय वनाधिकारी

वन्यजीव जखमी होण्याची कारणे
फासकीमध्ये अडकणे किंवा विहिरीत पडून जखमी होणे • वाहनाच्या धडकेने प्राण्यांना होणारी जखम • तारा वा जाळीमध्ये अडकून पक्षी जखमी होणे मानवी हल्ल्यामुळे वन्यजीव जखमी होणे

केंद्रामध्ये या असणार सुविधा
रेस्क्यू टीम, बचावपथक, तज्ज्ञ डॉक्टर, ऑपरेशन सेंटर, ट्रीटमेंट सेंटर, अॅम्ब्युलन्स, वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासाशी मिळतेजुळते वातावरण, वन्यजीवांना सुरक्षित ठेवण्यासाठी पिंजरे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:23 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow