तब्बल तीन वर्षांनंतर गुहागर नगरपंचायतीला मिळाले मुख्याधिकारी

Sep 9, 2024 - 10:03
Sep 9, 2024 - 17:05
 0
तब्बल तीन वर्षांनंतर गुहागर नगरपंचायतीला मिळाले मुख्याधिकारी

गुहागर : सप्टेंबर २०२१ नंतर प्रथमच गुहागर नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले आहेत. गुहागर नगरपंचायतीचे नवे मुख्याधिकारी म्हणून पोलादपूरचे स्वप्निल चव्हाण यांची स्वप्निल चव्हाण असेल याबाबत नियुक्ती झाली आहे.

स्वप्निल चव्हाण हे २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत आले आहेत. पोलादपूरमधील रहिवासी असल्याने कोकणचा परिसर, येथील समस्या, कोकणी जनतेची मानसिकता यासर्वांची माहिती असलेला अधिकारी गुहागरला मिळाला आहे. गुहागर नगरपंचायतीमध्ये यापूर्वी प्रसाद शिंगटे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. गुहागर नगरपंचायतीचा विकास आराखडा मंजुरीपर्यंत नेण्याचे काम प्रसाद शिंगटे यांच्या कार्यकाळात झाले. त्यानंतरस्वप्निल चव्हाण मुख्याधिकारी म्हणून दीर्घकाळ गुहागरात राहतील. प्राधान्यक्रम काय असेल याबाबत  मुख्याधिकारी चव्हाण म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वीच नियुक्ती झाल्याने शहरातील एलईडी लाईट सुस्थितीत आणणे ही आमची प्राथमिकता होती. आज शहरात ९५० हुन अधिक पथदीप आहेत. त्यापैकी जवळपास ७२५ पथदीप सुरू करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर ६ ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तेथील प्रकाश व्यवस्थाही सुरू केली. वास्तविक महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपंचायत, नगर परिषदांमधील पथदीप देखभाल दुरुस्तीचे कंत्राट ईसीएल या कंपनीकडे आहे. त्यांनी या कामासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री उपलब्ध करुन द्यायची असते. मात्र, २५ ठिकाणी आवश्यक साहित्याचा पुरवठा नगरपंचायतीने स्वखचनि केला आहे. उर्वरीत २२५ पथदीप हे तांत्रिक कारणांमुळे चालू होऊ शकत नाहीत, याशिवाय सर्व विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलशांची सद्यस्थिती व सुधारणा, विसर्जन मार्गाची स्वच्छता अशा विविध गोष्टी नगरपंचायतीने केल्या आहेत. कचरा व्यवस्थापन हे कौशल्याचे काम आहे. आजही गुहागर शहरातून ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून कचरा संकलन होत नाही. वर्गीकरण करून कचरा संकलीत करणे आणि संकलित कचऱ्यामधील प्लास्टिक कचऱ्याची विघटनापर्यंत व्यवस्था करणे, जेणेकरून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात आलेला कोणताच कचरा त्याच स्थितीत शिल्लक राहणार नाही. अशी कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

'नमो ११' योजनेतून गुहागरची पर्यटनवृद्धी करणार !
पुढील कालावधीत गुहागर नगरपंचायतीची सर्वात मोठी पाणी योजना परिपूर्ण प्रस्तावासह शासनाकडे पाठविणे आणि मंजुरीनंतर तिचे क्रियान्वयन करणे हे आपले लक्ष्य आहे. तसेच गुहागर नगरपंचायतीची निवड 'नमो ११' या योजनेत झाली आहे. या योजनेतून पर्यटन व्यवसायाच्या वृद्धीसाठी मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे या योजनेवर अधिक भर देऊन त्यातून गुहागर शहरातील पर्यटन विकासाला निधी मिळवून देण्यावर भर देणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:32 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow