राजापूर पालिकेचे सफाई कर्मचारी प्रमित जाधव झाले स्वच्छता निरीक्षक

Aug 24, 2024 - 11:30
 0
राजापूर पालिकेचे सफाई कर्मचारी प्रमित जाधव झाले स्वच्छता निरीक्षक

राजापूर : दिवसभर कार्यालयीन कामकाज आणि रात्री अभ्यास या पद्धतीने केलेल्या कठोर मेहनतीच्या जोरावर राजापूर पालिकेतील सफाई कर्मचारी प्रमित जाधव प्रशासकीय अधिकारी झाले. त्यांची स्वच्छता निरीक्षक म्हणून निवड झाली असून, पालिकेत पहिली नियुक्ती झाली आहे. सफाई कर्मचारी ते स्वच्छता निरीक्षक असा प्रवास सर्वांसाठी आदर्शवत आहे.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण राजापुरात घेतल्यानंतर मराठे महाविद्यालयातून प्रमित यांनी वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली, त्यानंतर प्रशासकीय अधिकारी होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. स्पर्धा परीक्षेच्या नियोजनबद्ध अभ्यासाला सुरुवात केली. २०१९ मध्ये ते सफाई कर्मचारी म्हणून त्यांना पालिकेत नियुक्ती मिळाली. तेथून त्यांचा शासकीय सेवेचा प्रवास सुरू झाला. मिळालेल्या यशावर समाधानी न राहता त्यांनी स्वच्छता निरीक्षक पदाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. स्वच्छता निरीक्षक पदाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. स्वच्छता निरीक्षक म्हणून झालेली निवड अन् प्रमितचे अभिनंदन केले जात आहे.

प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीला समाधानकारक यश मिळाल्याचा निश्चितच आनंद आहे. आई-वडिलांनी केलेले मार्गदर्शन अन् दिलेली मोलाची साथ, राजापूर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, वरिष्ठ अधिकारी अनुष्का जुवेकर, प्रसाद महाडिक यांचेही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. पालिकेमध्ये काम करताना मिळालेला अनुभव निश्चितच स्वच्छता निरीक्षक म्हणून काम करताना महत्त्वाचा ठरेल. प्रमित जाधव, स्वच्छता निरीक्षक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow