कोकण रेल्वे मार्गावर १५ सप्टेंबरला मडगाव-पनवेल विशेष गाडी

Sep 11, 2024 - 09:46
 0
कोकण रेल्वे मार्गावर १५ सप्टेंबरला मडगाव-पनवेल विशेष गाडी

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन येत्या १५ सप्टेंबर रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण २० एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे.

गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाकरिता वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार मडगाव ते पनवेल मार्गावर १५ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजून ३० मिनिटांनी विशेष गाडी (क्र. 01428) सुटेल. पनवेलला ती रात्री दहा वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. 01427) पनवेल येथून रात्री अकरा वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मडगावला पोहोचणार आहे. गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि पेण येथे थांबे असतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow