रत्नागिरीतील डॉ. अतुल ढगे दिल्लीतील 'समिट' मध्ये मार्गदर्शन करणार

Sep 11, 2024 - 10:15
Sep 11, 2024 - 14:18
 0
रत्नागिरीतील डॉ. अतुल ढगे दिल्लीतील 'समिट' मध्ये मार्गदर्शन करणार

रत्नागिरी : इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सेक्स्युअल मेडिसिन प्रॅक्टिशनर्स मॉडर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने आयोजित केलेल्या दिल्ली येथील 'सेक्स पॉझिटिव्ह समिट २०२४' मध्ये आंतरराष्ट्रीय मनोविकारतज्ज्ञ मान्यता प्राप्त व लैंगिक समस्यातज्ज्ञ डॉ. अतुल ढगे यांचा सहभाग असणार आहे.

या समिटचे आयोजन दि. १३ ते १५ सप्टेंबर २०२४ दरम्यान हॉटेल हॉलिडे इन, मयूर विहार, नवी दिल्ली येथे होणार आहे. यामध्ये भारतातील व इतर देशांतील लैंगिक समस्या तज्ज्ञांचा समावेश असतो.

या समिटमध्ये रत्नागिरीतील डॉ. अतुल ढगे १४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता 'हायपरसेक्स्युअलिटी स्पेक्ट्रमः अति लैंगिक वर्तन समजून आणि घेणे त्यावर उपाय शोधणे' या महत्त्वपूर्ण विषयावर आपले मार्गदर्शन करणार आहेत. रत्नागिरी येथील डॉ. अतुल ढगे हे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ असून, त्यांना लैंगिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यता मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:44 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow