ओणी प्रशालेत शिक्षक सत्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

Aug 28, 2024 - 10:01
 0
ओणी प्रशालेत शिक्षक सत्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

◼️ ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात सचोटीने काम करण्याची नितांत गरज : श्री. वासुदेव तुळसणकर

राजापूर : ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, संचालित नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी या प्रशालेत सेवानिवृत्त शिक्षक श्री. अप्पासाहेब उमराणीकर व यशवंत  विद्यार्थ्याचा गौरव सोहळा पार पडला.
    
कार्यक्रमांची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळेला व्यासपीठावर मान्यवरामध्ये माजी कार्यवाह व माजी मुख्याध्यापक श्री. शहाजी खानविलकर, संस्थेचे अध्यक्ष श्री. वासुदेव तुळसणकर सेवानिवृत्त सत्कारमूर्ती  उमराणीकर दापत्य 
संस्था पदाधिकारी रामचंद्र वडवळकर, शाळा समिती अध्यक्ष विजयकुमार वागळे, गणपत भारती, सेवानिवृत्त शिक्षक ईश्वर घुले, महादेव पाटील, डॉ. गुजर, नामदेव तुळसणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
      
सर्वप्रथम जुनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांणी वर्गवार  शिक्षक उमराणीकर यांना भेटवस्तू दिल्या. यानंतर प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला.
 
यावेळी इयत्ता दहावी, इयत्ता बारावी ( कला, वाणिज्य, विज्ञान ) तसेच  इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती, नवोदय, एन एम एम एस परीक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी अस्मिता चव्हाण, स्नेहल आचरेकर, सिद्धी चव्हाण या विदयार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षकामधून सचिन जाधव, संजय तुळसणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
   
मान्यवरांमध्ये डॉ. महेंद्र मोहन, गणपत भारती उमराणिककरांना सेवानिवृत्तनिमित्त शुभेच्छा दिल्या. श्री. शहाजी खानविलकर यांनी उमराणिकर यांना शुभेच्छा देताना त्यांच्या सेवेतील अनेक आठवणीना उजाळा दिला. यावेळी कार्यक्रमाचे सत्कारमूर्तीनी सत्काराला उत्तर देताना शाळेतील प्रत्येक घटकांनी एकमेकांशी सहकार्याची भूमिका ठेवावी. श्री. उमराणीकर यांनी शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
   
संस्थाचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी उमराणीकर याच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, सेवेतील तत्परता व ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक करून भावी  वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौं. सिया तुळसणकर यांनी केले. सूत्रसंचालन विनोद मिरगुले व महेंद्र पवार यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow