गणेशोत्सवात ट्रॅव्हल्सवाल्यांची कमाई

Sep 12, 2024 - 13:31
Sep 13, 2024 - 11:29
 0
गणेशोत्सवात ट्रॅव्हल्सवाल्यांची कमाई

गुहागर : गणेश उत्सवासाठी मोठ्या संख्येने आलेल्या गणेश भक्तांना परत आपल्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रचंड भाडे आकारीत असून याद्वारे गणेश भक्तांची आर्थिक लूट होत आहे. गुहागर ते मुंबई प्रवासी या लुटीमुळे हतबल झाले आहेत. गुहागर मार्गावर एस. टी. पेक्षा जास्त पैसे हे चाकरमानी नाईलाजाने मोजत असून खासगी ट्रॅव्हलवाल्यांची जणू दिवाळीच सुरू आहे. गणेशोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने येत आहेत. रेल्वेने येणे गुहागर तालुक्यातील प्रवाशांना सुलभ वाटत नाही. मुंबई पुण्यातून आपल्या घरी सणासुदीला येताना प्रत्येकाजवळ बऱ्यापैकी सामान असते. ते गुहागरला येताना अनेक वाहने बदलावी लागतात. त्यामुळे गुहागर तालुक्यातील प्रवासी आपल्या गावात थेट येण्याचा मार्ग स्वीकारतात. सध्या तालुक्यातील बहुसंख्य गावातून अशा खासगी ट्रॅव्हल्स सुटतात. सायंकाळी घरात जेवण करून निघालेला प्रवासी पहाटे मुंबईत थेट विरारला पोचतात. सकाळी उठून आपला कामधंदा वा नोकरी गाठणे त्याला सहज शक्य होते. शिवाय रस्त्यावरील खड्यांमुळे त्रास न होता ट्रॅव्हल्सवल्यांच्या पुशबॅक आसनांमुळे आरामदायी प्रवास होतो, मात्र, गुहागर तालुक्यातील खेडेगावच्या अशा प्रवाशांची एसटी पेक्षा ट्रॅव्हल्सला असलेली पसंती लक्षात घेऊन त्यांनी सिझनला प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे.

या गणेश उत्सव काळात गावी येणाऱ्या चाकरमान्यांना परत जाण्यासाठी काही ट्रॅव्हल्सवाल्यांनी ८०० रुपये तर काहींची मजल तेराशे तर दीड हजाराच्या तिकीटापर्यंत गेली आहे. वेगवेगळ्या खासगी मालकांच्या सुमारे १५ ते २० गाड्या दररोज गुहागरच्या विविध भागातून सुटत आहेत. शृंगारतळीची बाजारपेठ या गाड्याचे मोठे स्टँडच झाले आहे. या उलट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाच्या गुहागर-ठाणे, पुणे व मुंबई उपनगरात जाण्यासाठी बसेस आहेत. परंतु, गुहागर तालुक्यातील प्रवाशांना एसटीच्या लालपरी चे वाववडे असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाने महिलांना अर्धे तिकीट केल्याने, बसला बऱ्यापैकी प्रवासी असतात. शिवाय ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना प्रवासात सवलत आहे. तरीही लोकांची मानसिकता बदलेली नाही. किंवा एसटी अधिकाऱ्यांनीही ती बदलण्यासाठी तसदी घेतलेली नाही. यामुळे 'एसटी रिकामी तर ट्रॅव्हल्स फुल्ल' अशी गुहागरची स्थिती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:54 PM 9/12/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow