जमीन नावावर करण्यासाठी जाब विचारल्याने महिलेला मारहाण

Sep 12, 2024 - 12:32
 0
जमीन नावावर करण्यासाठी जाब विचारल्याने महिलेला मारहाण

रत्नागिरी : भावाच्या नावावर जमीन करण्यासाठी पैसे घेऊनही जमीन नावावर न केल्याप्रकरणी जाब विचारला या रागातून महिलेला तिच्याच ६ नातेवाइकांनी मारहाण केली. ही घटना सोमवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वा. ओमकार रेसिडेन्सी नाचणे येथे घडली.

दिलीप कीर, रूपाली कीर, अमृता खेडेकर, श्रद्धा निमगरे, अनुजा कीर, प्रसाद खेडेकर (सर्व रा. रत्नागिरी) अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

यासंदर्भात पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, अनुजा कीर ही फिर्यादी, महिलेची मावस बहीण आहे. तिच्या सोबत भांडण झाले, त्यावेळी फिर्यादीने तिला माझ्या भावाच्या नावावर जमीन करण्यासाठी पैसे घेऊनही जमीन नावावर करून का दिली नाही अशी विचारणा केली होती. याचा राग मनात धरुन सोमवारी सायंकाळी ६ संशयितांनी फिर्यादीच्या घरात घुसून संगनमताने तिला मारहाण केली. यात तिच्या अंगावरील कपडे फाडून गळ्यातील मंगळसूत्र व हातातील ब्रेसलेट तोडून नुकसान केले. या सर्व प्रकारात फिर्यादी महिला वाचवा वाचवा असे ओरडत घराबाहेर आली असता तिथेही तिला संशयितांनी मारहाण केली.

याप्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११५ (२), ३५२,३२४(४),३३२ (क) १८९ (२), १९०,१९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow