रत्नागिरी : आदित्य पराडकरने साकारले भारतीय सण, उत्सवाची परंपरा सांगणारे डिजिटल चित्र

Sep 14, 2024 - 10:05
Sep 14, 2024 - 12:13
 0
रत्नागिरी : आदित्य पराडकरने साकारले भारतीय सण, उत्सवाची परंपरा सांगणारे डिजिटल चित्र

संगमेश्वर : रत्नागिरी येथील कलाकार (सध्या पुणेस्थित) आदित्य नरेंद्र पराडकर याने सहा महिन्याच्या अथक मेहनतीतून साकारलेले 'भारतीय सण आणि उत्सव' हे डिजिटल चित्र रत्नागिरी येथील सुरुची स्वीट मार्टमध्ये मालक मंगेश गांधी यांनी लावले आहे. उत्सवाची परंपरा सांगणारे हे भव्य चित्र पाहून ग्राहकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

मंगेश गांधी यांच्या मनात विविध संकल्पना येत असतात. आपल्या दुकानात येणारा ग्राहक केवळ खरेदी करून काउंटरच्या मागे असणाऱ्या १२ फूट लांब आणि साडेपाच फूट उंच जागेत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे डिजिटल चित्र तयार करण्याचे काम चित्रकार आदित्य नरेंद्र पराडकर याने सुरू केले. या चित्रात गुढीपाडवा, गणेशोत्सव, पंढरीची वारी, रामनवमी, दिवाळी, शिमगा नवरात्रोत्सव, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, बुद्ध जयंती, बैसाखी, नाताळ आदी १८ सण उत्सावांचे दर्शन होते.

पंधरा दिवस रेखाटन
भारतीय सण आणि उत्सव या संकल्पनेवर चित्र साकारण्याचे ठरल्यानंतर प्रथम पाहिले पंधरा दिवस रेखाटन करण्यातच गेला. अंतिम रेखाटनाला गांधी यांनी मान्यता देताच प्रत्यक्ष चित्र रेखाटन आणि रंगकामाला सुरुवात केली. सहा महिन्यांच्या कालावधीत जीव ओतून हे चित्र साकारण्याचा आपण प्रयत्न केला. अशी भावना चित्रकार आदित्य नरेंद्र पराडकर यांनी व्यक्त केली.

आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी चित्राद्वारे अनोखा संदेश देत त्यांचे स्वागत करावे, या हेतूने 'भारतीय र सण उत्सव' हे भव्य चित्र दुकानात लावले. - मंगेश गांधी, व्यापारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow