वृक्षतोड थांबवून, नव्याने वृक्ष लागवड करा सांगणारा पावसमध्ये देखावा

Sep 14, 2024 - 15:35
 0
वृक्षतोड थांबवून, नव्याने वृक्ष लागवड करा सांगणारा पावसमध्ये  देखावा

पावस : दिवसेंदिवस जंगलतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा दुष्परिणाम सर्व गोष्टींवर होत आहे. त्यामुळे वृक्षतोड थांबवणे आणि नव्याने वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे, याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने नुकसान रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील शांताराम घाटकर यांनी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक संदेश देणारा देखावा साकारला आहे. 

या संदर्भात शांताराम घाटकर म्हणाले, गेली बारा वर्ष नवीन नवीन देखावांच्या माध्यमातून समाजजागृतीचे काम करत आहे. देखाव्याला चांगला अचानक प्रतिसाद मिळत असल्यामुळे दरवर्षी सर्किटचा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून राथमिक स्पर्धा भरवल्या जातात, त्यामध्ये सहभागी झालेल्या देखव्यामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने उपयोग होतो. नव्याने बनवण्यात येणाऱ्या देखाव्यांकरिता फार मेहनत घ्यावी लागते. त्याकरिता कुटुंबातील व्यक्तींचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच देखावा बक्षीसपात्र होतो. देखाव्याची जुळवाजुळ करण्याकरिता महिनाभर मेहनत करावी लागते. शेवटच्या १० ते १२ दिवसांमध्ये देखावा पूर्णत्वास जातो. श्री. घाटकर म्हणाले, सुरवातीपासून हौसेने समाज प्रबोधनासाठी काम करण्याचे ठरवण्यात आले. बक्षीस मिळवणे हा मुख्य हेतू न ठेवता समाजाला प्रबोधनाची गरज आहे त्यादृष्टीने देखावे साकारतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:03 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow