रत्नागिरी : जिल्ह्यातील एक्साईजच्या पाच युनिटची दोन विभागांत रचना

Sep 16, 2024 - 11:37
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील एक्साईजच्या पाच युनिटची दोन विभागांत रचना

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) दोन युनिट रद्द झाली आहेत. लांजा आणि रत्नागिरी ग्रामीण ही दोन युनिट बंद होऊन या युनिटचे कामकाज आता राजापूर आणि चिपळूण विभागांतर्गत होणार आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड, चिपळूण, लांजा, रत्नागिरी ग्रामीण, रत्नागिरी शहर अशी पाच स्वतंत्र कार्यकारी युनिट होती. या युनिटच्या कार्यालयांमधून महा संदर्भातील परवान्यांची कामे, नूतनीकरण, विसंगती कारवाई अशी कामे होतात. जिल्ह्यात अशी पाच युनिट होती ती आता दोन विभागांमध्ये सामावली गेली आहेत. नव्याने निर्माण झालेल्या चिपळूण विभागात लांजा, संगमेश्वर तालुके समाविष्ट झाले आहेत. तर रत्नागिरी विभागामध्ये राजापूर तालुका आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या नव्याने निर्माण झालेल्या दोन विभागांची रचना पोलीस ठाणेनिहाय करण्यात आली आहे. परंतु जुन्या स्टाफनुसार ही रचना सध्यातरी अडचणीची बनली आहे. देशी, विदेशी मद्य, माडी व इतर आस्थापनांनासुद्धा राज्य उत्पादन शुल्कची ही नवीन रचना अडचणीची असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 16-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow