राजापूर शहरातील मालमत्तांवर क्यूआर कोड

Aug 16, 2024 - 11:16
Aug 16, 2024 - 11:43
 0
राजापूर शहरातील मालमत्तांवर क्यूआर कोड

राजापूर : राजापूर नगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छता अभियान अधिक व्यापक करून पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला आहे. शहराच्या विविध भागातील कचऱ्याचे वेळच्या वेळो संकलन होते की नाही? घंटागाडी पोहचते की नाही? यावर वॉच राहण्यासाठी शहरातील मालमत्तांवर क्यूआर कोड तसेच शहरामध्ये स्ट्रीट स्विपिंग पॉइंटसही बसवल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून क्यूआर कोड आणि स्ट्रीट स्वीपिंग पॉईंटसही बसवल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

क्यूआर कोड आणि स्ट्रीट स्वीपिंग पॉईंटस कचरा संकलन आणि रस्त्याच्या साफसफाईवर वॉच ठेवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असल्याचेही प्रशासनाकडून यावेळी स्पष्ट करण्यात  आले. शहरामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नगरपालिकेतर्फे घंटागाडी आणि सफाई कर्मचाऱ्यांतर्फे नियमित संकलन केले जाते तरीही अनेक भागातील लोकांकडून नियमित कचरा उचलला जात नाही, घंटागाडी येत नाही अशा सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी येतात. या तक्रारीचे तत्काळ निवारण व्हावे, परिसराची स्वच्छता व्हावी आणि कचरा संकलनामध्ये पारदर्शकता अन् व्यापकता यावी म्हणून शासनातर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मॉनिटरिंगसाठी आयसोटी बेसप्रणाली कार्यरत केली आहे. त्याची नगर पालिकेतर्फे अंमलबजावणी करण्यात आली. 

शहरामध्ये मालमत्तांवर आणि ओला अन् सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डस्टबिनवर क्यूआर कोड बसवला आहे. कबसवला आहे. कर्मचाऱ्यांद्वारे कचरा घेतल्यानंतर क्यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन केला जातो. यामुळे कचरा गोळा केला की नाही याची अपडेट माहिती प्रशासनाला मिळते, 'स्ट्रीट स्विपिंग पॉईंटस हारे रस्त्यांची नियमित स्वच्छता ठेवली जाते आहे की नाही, याची अपडेट सातत्याने मिळत आहे.

नेमके फायदे किती ?
कचरा उचलला गेल्याची नोंद
कचऱ्यासंबंधित तक्रारींवर अंकूश
कचरा संकलनामध्ये पारदर्शकता
रस्त्यांच्या स्वच्छतेवर राहतोय वॉच
गटारांच्या साफसफाईवर लक्ष

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow