गणेशोत्सव मिरवणूकीदरम्यान चिपळूणात डीजे, लेसर लाईटवर बंदी

Sep 16, 2024 - 12:04
Sep 16, 2024 - 12:12
 0
गणेशोत्सव मिरवणूकीदरम्यान चिपळूणात डीजे, लेसर लाईटवर बंदी

चिपळूण : गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक दरम्यान डी.जे.सह लेसर विद्युत रोषणाई, प्रकाशझोतांचा वापर केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा चिपळूण पोलिसांनी दिला आहे. या संदर्भात नुकतीच बैठक झाली. यामध्ये विसर्जन मिरवणूक व गणेशोत्सव साजरा करताना कोणीही डीजेचा वापर करू नये, तसेच लेसर प्रकाशझोताचा वापर करू नये अशी सूचना संबंधितांना देण्यात आली.

दरवर्षी गणेशोत्सव काळात उत्सव व विसर्जन मिरवणूक दरम्यान घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात व मोठ्या आवाजात डी. जे. व प्रखर विद्युत रोषणाईचा वापर केला जात आहे. सध्या लेसर किरण विद्युत रोषणाईचा वापर वाढला आहे. वाद्यसंगिताच्या व डी. जे. च्या चालीवर विद्युत रोषणाईसह लेजर प्रकाशझोत वापरण्याची नवी टूम निघाली आहे. मध्यंतरात लेसर किरणांमुळे एका तरुणाच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याची बाब उघड झाली. परिणामी शासनाने डी.जे. आणि लेसर किरण प्रकाशझोत वापरण्याबाबत बंदी आदेश काढले. त्याची अंमलबजावणी पोलिस खात्याला करण्याचे आदेश दिले, त्यानुसार चिपळुणातही पोलिसांकडून या बाबत संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणुकीत डी. जे. चा वापर करू नये. त्याचप्रमाणे विद्युत रोषणाईमध्ये लेसर किरण प्रकाशझोताचा वापर करू नये अशी स्पष्ट सूचना देत त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशिर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow