लांजात अंडरपास ब्रीज उभारण्याची मागणी

Sep 16, 2024 - 11:55
 0
लांजात अंडरपास ब्रीज उभारण्याची मागणी

लांजा : लांजा शहरात अंडरपास ब्रीज उभारावा यासाठी रविवारी खासदार नारायण राणे यांना लांजा शहर समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. लांजा तहसील कार्यालय ते एसटी डेपो येथे मातीचा भराव न करता अंडरपास ब्रीज करावा, अशी मागणी करण्यात आली.

खासदार राणे यांनी या मागणी संदर्भात आपण स्वतःहून लक्ष घालणार असल्याचे लांजा शहर समन्वय समितीला आश्वासन दिले. नारायण राणे हे चिपळूण दौऱ्यासाठी निघाले असताना त्यांची लांजा शहर समन्वय समितीने भेट घेतली. यावेळी महामार्ग कामांबाबत व्यापारी व प्रवाशी, नागरिकांना होणाऱ्या अडचणी, समस्या सांगितल्या. यावेळी हे निवेदन देण्यात आले. लांजा शहरात बसवेश्वर चौक ते साठवली तिठा या दरम्यान उड्डाणपुलाचे बांधकाम चालू आहे.

या परिसरात तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, लांजा हायस्कूल, महाविद्यालय, लांजा ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय ही महत्त्वाची कार्यालय असल्याने नेहमीच नागरिकांची गर्दी असते. प्रस्तावित उड्डाण पुलाचे बांधकाम मातीचा भराव टाकून करण्यात येणार असल्याने नागरिकांना ये-जा करण्यास मोठी गैरसोय होणार आहे. विद्यार्थी, नागरिक यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी अंडरपास ब्रीज करावा, अशी मागणी लांजा शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, चंद्रशेखर स्वामी व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी अभिजित ज्येधे, नगरसेवक लांजेकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow